विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला चंद्रपूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट.

55

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला चंद्रपूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट.

Meeting of Chandrapur District Collector and Chief Executive Officer at Nunhara Sales Center under Vikel to Pickel scheme.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 10 मार्च :- कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका भद्रावती येथील विक्री केंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच भेट देवून पाहणी केली.

सदर विक्री केंद्रावरील उपलब्ध असलेला मध, हळद, सेंद्रिय भाजीपाला, गावठी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, दिवे याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी माहिती घेतली तसेच विक्री केंद्राला शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार महेश शितोळे, संवर्ग विकास अधिकारी मंगेश परिवार, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, मंडळ कृषी अधिकारी अरुण झाडे, कृषी पर्यवेक्षक पंकज ठेंगणे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर हिवसे, कृषि सहाय्यक जे.बी. निहारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.