झाला सैराट, पळून जाऊन लग्न केलं म्हणून जावयाच कापल शीर; बहिणीला लटवल फासावर…
जावयाची गळा कापून हत्या करुन शीर गोणीत भरून आणल पोलिस स्टेशनला.
जबलपूर,दि,11.मार्च:- मध्य प्रदेश येथील जबलपुरच्या तीलवारा येथील बर्मन क्षेत्रात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या खोटी इज्जत जपण्यासाठी एका प्रेमकथेचा दु:खद अंत करण्यात आला. आरोप आहे की, तरूणाने त्याच्या भावोजीची कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली. तर दुसरीकडे बहिणीचा मृतदेह घरात फासावर लटकलेला दिसला. ही घटना गुरूवारी सकाळी 9.30 वाजताची आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
13 डिसेंबर 2020 ला आरोपी मिटू उर्फ धीरज शुक्ला यांची बहिण पुजा वय 19 वर्ष ही घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप वय 40 वर्ष नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता. तिलवाराच्या शंकरघाटमध्ये राहणारा मिंटू शिवराम शुक्ला ऊर्फ धीरज वय 35 वर्ष पोलीस स्टेशनमध्ये एक पिशवी घेऊन पोहोचला. ज्यात त्याचा भावोजी ब्रजेश कश्यपचं डोकं होतं. जे पाहून पोलीस हैराण झाले.
धीरजला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने ब्रजेश कश्यप ची रमनगराच्या बर्मन गल्लीत हत्या केल्याचं कबूल केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तर त्यांना शेतात ब्रजेशचं धड आढळून आलं.
पूजाने घरी जाण्यास नकार दिला होता. ब्रजेश आणि पूजा जबलपूरच्या गढामध्ये भाड्याच्या घरात राहत होते. गुरूवारी तो आपल्या गावी आला होता. यादरम्यान धीरज शुक्लाने त्याची गळा कापून हत्या केली. हत्येच्या काही वेळातच पोलिसांना सूचना मिळाली की गढामध्ये पूजाचा मृतदेह फासावर लटकलेला आहे. आता पूजाने आत्महत्या केली की, तिचीही हत्या झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.