बायकोने आधी नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि केला मर्डर.
✒नागपुर जिल्हा प्रतीनिधी✒
नागपूर,दि.11 मार्च:- नागपूरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी रजत संकुलमध्ये एका वृद्ध इसमाचे हात-पाय खुर्चीला बांधल्यानंतर गळा चिरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांकडुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसापुर्वी वृद्ध लक्ष्मण मलिक यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपुर्ण नागपुर हादरले होते. मृतक लक्ष्मण मलिक हे गेल्या काही दिवसांपासून एकटेच रजत संकुल येथील फ्लॅट मध्ये राहत होते. दरम्यान, 8 मार्चला संध्याकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वाती त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले पोर्न व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर तिने सोबत आणलेल्या धारधार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतीन घटनास्थळावरून पोबारा झाली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले. मृतकाचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा खुलासा झाला. मृतक मलिक यांनी तब्बल पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पडली.
पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलावले. यापैकी पाचवी पत्नी स्वातीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कडक चौकशी केली. तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली.