नटराज लोककला कलाकार मंडळ खुटसावरी तर्फे भव्य कलावंताचा शाहीर सम्मेलन, विदर्भातील कलावंताचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम

भवन लिल्हारे ✍️
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणारे मौजा खुटसावरी येथे ” नटराज लोककला कलाकार मंडळाच्या वतीने दिनांक १२ व १३ मार्च २०२२ रोज शनिवार व रविवार ” असे दोन दिवसीय विदर्भ स्तरीय लोककलावंताचा भव्य शाहीर सम्मेलन आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य शाहीर सम्मेलन मौजा खुटसावरी येथील ग्राम पंचायत समोरील भव्य पटांगणावर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात विदर्भातील नवटंकी नाटक, तमाशा, लावणी, गोंधळ, भारुड,कलापथक,दंडार,भजन, किर्तन, डहाका, नकला, नृत्य, शाहिरी पोवाडे, जात्यावरची गाणी, रोवणीवरची गाणी, लग्नाची गाणी, किंगरी वादन, कथावाचन,गायन, वादन व विविध सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुष व महिला कलावंताचा दोन दिवसीय भव्य कलाकार मेळावा व कला प्रदर्शनी, व संत साहित्य सुधा कला प्रदर्शनी दिनांक १२ व १३ मार्च रोजी ग्राम पंचायत कार्यालय समोरील भव्य पटांगणावर करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थिती दर्शवावी असे सर्व संगीत प्रेमी युगुल जनतेला, महिलांना, बालगोपाल यांना भारतीय संस्कृती टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. या करीता नटराज लोककला कलाकार मंडळाच्या कार्यकारिणी आवाहन केले आहे.

दिनांक १२ मार्च २०२२ रोज शनिवारला सकाळी ४:३० वाजता ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, सकाळी १०:३० वाजता दिप प्रज्वलन व उद्घाटन सोहळा, सकाळी ११:३० वाजता विदर्भातील कलावंताचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ७:३० वाजता नवअंकी नाटकाच्या कलावंताचे कला सादगिकरण सादर करण्यात येईल.

 दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवारला  पुन्हा सकाळी ४:३० वाजता ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, सकाळी ८:०० वाजता विदर्भातील कलावंताचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी २:०० वाजता शाहीर श्री. नीलकंठ निंबार्ते साथी भाऊराव तूर्रा पार्टी वडेगाव यांचा गोंधळाचा कार्यक्रम होईल, व सायंकाळी ५:०० वाजता लोककलावंत कलाकार यांना मान्यवरांचे हस्ते सत्कार व प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल, अशी माहिती ” “नटराज लोककला कलाकार मंडळ खुटसावरी ” येथील संस्थापक / अध्यक्ष मा.श्री. देवदासजी लिल्हारे, उपाध्यक्ष मा.श्री. वसंत एच लिल्हारे, सचिव मा.श्री. सोमप्रभू तांदूळकर, सहसचिव मा.श्री. नाथा बावणे, कोषाध्यक्ष मा.श्री. दिलीप चन्ने, सदस्य मा.श्री. रविशंकर लिल्हारे, मा.श्री. शंकर दमाहे, मा.श्री. रामदयाल लिल्हारे, मा.श्री. संतोष लिल्हारे, या आयोजक मंडळांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थिती म्हणून लाभनारे मोहाडी तालुका कार्यकारिणी जिल्हा भंडारा, तुमसर तालुका कार्यकारिणी जिल्हा भंडारा, तिरोडा तालुका कार्यकारिणी जिल्हा गोंदिया, रामटेक तालुका कार्यकारिणी जिल्हा नागपुर, असे अनेक तालुका,जिल्ह्यातील कलावंत कलाकार मंडळ यांची उपस्थिती राहणार असे आयोजक मंडळ यांनी सांगितले आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते कलावंत कलाकार यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय हि कार्यकारिणी मंडळ यांनी केली आहे.

या कार्यक्रमाची विशेष सूचना
१) विदर्भातील कलावंताचे महिला / पुरुष यांचे कार्यक्रम सतत दोन दिवस चालू राहील.
२) अंगावर ओढण्याचे साहित्य स्वतःचे घेऊन यावे.
३) कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांनी प्रत्येकी १५० रुपये प्रवेश शुल्क देणे बंधनकारक राहील.
४) दिंगा फिसाद करणाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.
५) नैशर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही.
६) राहण्याची व जेवणाची सोय मंडळाकडे राहील.
७) मंडळाचे निर्णय हे अंतिम निर्णय राहील.
तरी या विदर्भ स्तरीय लोककलावंत कलाकार भव्य शाहीर संमेलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा व आवाहन आयोजक मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

हे आपण वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here