महिलांची गरुडझेप लक्षणिय

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” या विषयावर व्याख्यान आयोजित

 

महिलांची गरुडझेप लक्षणिय

रशाद करदमे
११ मार्च, श्रीवर्धन: श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.महिला विकास मंच प्रमुख प्रा.दिपाली पाथराबे यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका मांडली.प्रास्ताविक भाषणात त्यांनी वर्षभरात विद्यार्थिनींना स्वातंत्र्य मंच मिळावा यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि आपल्या जबाबदारी व कर्तव्याची जाणीव असावी असे म्हटले.

सदर कार्क्रमात प्रमुख अतिथिंचे स्वागत विद्यार्थिनीने लेझिम,रांगोळी आणि औक्षण करून केले.प्रमुख पाहुणे म्हणून नांदवी येथील निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चौगुले यांनी महिलांनी कला,क्रीडा,साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात घेतलेल्या गरुडझेपेची यशोगाथा व्यक्त केली.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा व श्रीवर्धन येथील जेष्ठ कवयित्री श्रीमती सीमा रिसबूड यांनी विद्यार्थिनींना यशस्वी जीवनाची गुरकिल्ली दिली.विकासाच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले व्यक्तिमत्व सिद्ध करताना स्वातंत्र्याचा गैरवापर व गैरअर्थ काढून कुटुंबाची आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी स्पष्ट भावना व्यक्त केली.

.श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” या विषयावर व्याख्यान

समाजात महिलांवरील वाढते अत्याचार,अन्याय व बलात्काराच्या घटना लांच्छनास्पद आहेत.आम्ही सर्व कर्तुत्ववान महिलांना सलाम करतो असे प्रतिपादन श्रीवर्धनचे उप अधीक्षक श्री.स्वामी साहेब यांनी मांडले. जीवनात सीमारेषा न ओलांडता महिलांनी फॅशनच्या नावावर पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू नये.कुटुंब व समाज व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी,स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचे भान ठेवावे पालकांनी मुलींना संस्कार देण्यासाठी कटिबध्द रहावे अशी विनम्र व कळकळीची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली.

 

हे आपण वाचलंत का?

 

सदर कार्यक्रमास अराठी ग्राम पंचायत सरपंच परवीनबेन नाझ उपस्थित होत्या.श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या वतीने शैलेश ठाकूर यांनी मुलींना संरक्षणाचे धडे दिले.यावेळी पी. एस. आय.संगीता गावडे,सिद्धेश गुरव,श्री पेडवी आणि सर्व महिला पोलिस कर्मचऱ्यांनी सहकार्य केले.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थिनीने केले.सूत्रसंचालन कू.मरियम खान,नेहा पवार व विशाखा विचारे ह्यांनी केले,तर आभार प्रदर्शन मुस्कान दर्जी हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पाथरबे,सुरेखा चित्ते,मृण्मयी भुसाने आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री.नितीन सुर्वे,श्री.शांतीलाल जैन व श्री.राजेंद्र भोसले यांनी कौतुक केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here