राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधान परिषदेच्या गटनेते पदी एकनाथराव खडसे

57

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधान परिषदेच्या गटनेते पदी एकनाथराव खडसे

खंडू महाले

जळगाव प्रतिनिधी

मो.8767886785

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विधान परिषदेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे यांची गटनेते पदी निवड व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार , प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटिल , विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिफारस केलेली होती. एकनाथराव खडसे यांना विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असून ते ज्येष्ठ नेते आहेत यामुळे निश्चितपणे त्यांच्या आक्रमक वकृत्व शैली व कार्यपद्धतीचा पक्षासाठी योग्य उपयोग होईल व नागरिकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागतील अशी खात्री असल्यामुळे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून व नाथाभाऊंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. एकनाथराव खडसे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात त्यामुळे त्यांची घटनेचे पदी नियुक्ती झाली असल्याने कार्यकर्त्यांना पाठबळ मिळेल असे भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या .

         याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , रिकू चौधरी , राजू मोरे , अमोल कोल्हे , इब्राहिम तडवी , रमेश बहारे , दिलीप पवार , रमेश पाटील , रहीम तडवी, जितेंद्र चांगरे , विशाल देशमुख , ललित नारखेडे , साहिल पटेल , राहुल टोके , सचिन साळुंखे , कुंदन सूर्यवंशी , भाला तडवी , चेतन पवार , योगेश साळी , भुमेश निंबाळकर , हितेश जावळे , नितिन जाधव , सतीश चव्हाण , शैलेश अभंगे ,राजेंद्र भंगाळे , भीमराव सोनवणे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.