कोमसाप तळा शाखेतर्फे अॕड.परेश जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, कविता, गाणी, गझल, गप्पांनी वाढली कार्यक्रमाची रंगत
संतोष मोरे
माणगाव प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विधीज्ञ,उत्तम कवी,रायगड भुषण अॕड.परेश जाधव* यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित केलेल्या कविसंमेलन,गाणी,गप्पांच्या मैफिलीने अभिष्टचिंतन सोहळ्याची रंगत वाढवली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन हितकारीणी सभा अध्यक्ष रविंद्र जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यवाह तथा को.म.सा.प.शाखा माणगाव अध्यक्ष अजित शेडगे,बहुजन हितकारीणी सभा सचिव किशोर शिर्के,ज्येष्ठ आदर्श शिक्षक मनोहर दांडेकर,सकपाळ,सत्कार मुर्ती अॕड.परेश जाधव उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व गणेश पूजन करण्यात आले.प्रास्ताविकात को.म.सा.प.शाखा तळा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी मनोगतात परेश सरांचे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक जीवनातले अनेक पैलू उलगडले.त्यांचा संघर्ष मांडून त्यांच्यावरील एका कवितेचे सादरीकरण केले.तसेच उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी मनोगतात मनोहर दांडेकर,संदिप जामकर,बाबाजी धोत्रे,परमानंद कजबजे,भरत जोशी,पारस माळी,उल्का माडेकर,संदेश शिंदे,अजित शेडगे,भिमराज मोरे,किशोर शिर्के,ऋतूजा रायकर,
रघुनाथ पोवार,संतोष रणपिसे,धनंजय ढवळे यांनी कविता,गाणी,चारोळी यांची अद्वितीय मैफिल सजवून परेश सरांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.को.म.सा.प.शाखा तळाचे वतीने परेश सरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.सन्मानपत्राचे सुरेख वाचन कवयित्री सौ.उल्का माडेकर यांनी केले.अध्यक्षीय मनोगतात रविंद्र जाधव यांनी सांगितले की,”गोरगरीबांचा वकील कसा असावा याचा उत्तम आदर्श म्हणचे परेश सर आहेत.आपल्या कायदेविषयक ज्ञानाने परेश सर खेडोपाड्यात आदिवासी वाड्यात जनजागृतु करण्याचे काम विनामुल्य करत असतात.प्रेम,आपुलकी,लहान-थोरांना आदर,माणुसकी,अभ्यासुवृत्ती हे सारे गुण आपण परेश सरांकडून शिकले पाहिजेत असे स्पष्ट करुन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच तसेच गावातील अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून सरांचे अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उल्का माडेकर तर आभार प्रदर्शन संतोष मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी को.म.शाखा तळा परिवार तसेच डॉ.पुनम जाधव,स्नेहा साळुंखे यांनी मेहनत घेतली.