एन. जे. पटेल महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्युज

मो: 9860020016

मोहाडी : – मोहाडी येथील एन. जे. पटेल महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘महिलांचे आरोग्य व काळजी’ या विषयावर वैद्यकीय चमूकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची एच आय व्ही तपासणी सुद्धा करण्यात आली. 

 महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथील डॉ शिल्पा तुमसरे मॅडम ,कु. माधुरी फुले मॅडम व श्री संतोष भूरे यानी विद्यार्थिनीना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कोणता घ्यावा, विविध रोगाविषयी माहिती व बचाव कसा करावा या विषयी समुपदेशन केले. श्री भूरे यानी एच आय व्ही व एड्स रोगाविषयी माहिती देवून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. 

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे यानी प्रास्ताविकातुन जागतिक महिला दिनाचा इतिहास, उद्दीष्टे, या वर्षीची थीम, भारताच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व या विषयावर प्रकाश टाकला. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जे.एम.पांडे यानी विद्यार्थिनीना तारुण्य अवस्थेत कसे वागावे, मोबाइल चा वापर कसा करावा, स्वतःला सशक्त कसे करावे या विषयी प्रेरित केले. या प्रसंगी डॉ वरकड़े सर, डॉ चवळे सर, डॉ वानखेडे सर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिक्षा हेड़ाऊ तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सेलोकर हीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here