नृत्यालिका प्रतिष्ठानचा पंचरत्न पुरस्कार सोहळा संपन्न

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- भरतनाट्यम व लोकनृत्य प्रशिक्षण केंद्र असलेल्या नृत्याव्दारे संस्कृतीची जपणूक व सामाजिक बांधिलकी जपणा-या नृत्यालिका प्रतिष्ठान च्या वर्ल्ड बुक आॕफ रेकाॕर्ड, महाराष्ट्र गौरव, जीवनगौरव असे नानाविध पुरस्कार प्राप्त संचालिका डाॕ. किशु पाल यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या समाजसेविका सौ. सुरक्षा घोसाळकर यांना जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पंचरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुरक्षा घोसाळकर यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अविरतपणे निस्पृह भावनेने गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यांच्या ह्या असीम कार्याची दखल नृत्यालिका प्रतिष्ठानने घेतली आणि पंचरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. 

        त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, पालकां सोबत संवाद साधताना सुरक्षा घोसाळकर यांनी गेली ४० वर्षे तळागाळातील विद्यार्थ्यांचे नृत्यकलेच्या माध्यमातून जीवनातील भाव राग ताल यांचे संतुलन राखून समाजातील प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याचा वसा घेतलेल्या नृत्यालिका प्रतिष्ठान परिवाराबद्दल समाजाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थी पालकांच्या नृत्य कलाविष्काराने जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी मुंबई विभागातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. नृत्य प्रेमींच्या कलागुणांना वाव देण्याचा सुंदर प्रयत्न केला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here