पोलीस आयुक्तांचा ऑफिसमध्येच मृत्यू, जेवणानंतर विश्रांती घेत असताना दुर्दैवी घटना

हिरामण गोरेगावकर

११ मार्च: येलो गेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन बोबडे यांचं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. बोबडे कार्यालयात असतानाच दुपारी दोन ते चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नितीन बोबडे सकाळी १० च्या सुमारास कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बोबडे यांनी जेवणं केलं आणि त्यानंतर आपल्या कक्षात विश्रांती घेत होते.

दरम्यान पावणे चारच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी दार वाजवल्यानंतर त्यांनी आतून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले तेव्हा बोबडे कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीच प्रयत्न केले मात्र त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले नाही. सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन सुरू आहे. त्यांच्या मृत्यूने पोलिस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here