भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूक नानाभाऊ पटोले यांनी लढावी
काँग्रेस कार्यकर्ते आणि जनसामान्य मतदात्यांची इच्छा.
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा / गोंदिया📱मो.नं.9373472847📞
गोंदिया – देशात लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आणि महाराष्ट्रात आता पर्यंत कोणत्याही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यातच भंडारा -गोंदिया लोकसभा सीट काँग्रेसच्या कोट्यात गेल्यामुळे २०- २५ वर्षानंतर पंजा निशाण मतदात्यांना पहावयास मिळणार आहे. काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मात्र प्रचंड उत्साहात दिसू लागले आहेत.या पूर्वी या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचा दावा असायचा पण खा. प्रफुल पटेल यांनी भा. ज. पा.सोबत हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे जे मतदान राष्ट्रवादीला मिळत होते. ते पुन्हा काँग्रेस पक्षात परत येण्याच्या मार्गांवर आहेत. जनसामान्य मतदाता जो काँग्रेस पक्षाचा होता. तो राष्ट्रवादी पक्षाला मत देत असे पण या लोकसभा नेवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाला सीट मिळाल्यामुळे ते कार्यकर्ते उत्साहित आहेत. या सर्व सामान्य कार्यकर्ता जो काँग्रेस पक्षाचा आहे त्याची मनापासून इच्छा आहे की, जाणसामान्यांचा नेता नानाभाऊ पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढावी, त्यातल्यात्यात राष्ट्रवादी चे कार्यकर्ते जे काँग्रेस चे समविचारी आहेत ते सुद्धा चर्चा करताना नानाभाऊ पटोले यांनीच भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूक लढावी. असे मत सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि जनसामान्यांच्या मनातून निघणाऱ्या आवाज नानाभाऊ पटोले यांनी समजून पक्ष श्रेष्टी पर्यंत पोहचवून काँग्रेस कार्यकर्त्यांचा मागणीला धरून लावण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाला दोन्ही जिल्ह्यातून हद्द पार करण्याची ही खरी वेड आली आहे.