श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, चंद्रपूरची बैठक संपन्न • समिती अध्यक्ष म्हणून शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, सचिव विनोद उपाध्याय यांची घोषणा

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, चंद्रपूरची बैठक संपन्न • समिती अध्यक्ष म्हणून शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, सचिव विनोद उपाध्याय यांची घोषणा

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, चंद्रपूरची बैठक संपन्न

• समिती अध्यक्ष म्हणून शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, सचिव विनोद उपाध्याय यांची घोषणा

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, चंद्रपूरची बैठक संपन्न • समिती अध्यक्ष म्हणून शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, सचिव विनोद उपाध्याय यांची घोषणा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 11मार्च
दरवर्षी होणारा श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रीरामनवमी निमित्त मोठ्या प्रमाणात शोभायात्रा, झाकी, ढोल ताशा, पारंपरिक नृत्य वेशभूषा, श्रीराम जन्मभूमी अयोध्याचे चित्ररथ व अन्य विविध संदेश देणारे रथ हे निघत असतात. यामध्ये जिल्ह्यातील सर्व समाजातील हिंदू बांधव हे मोठ्या प्रमाणात उत्साहाने संमेलीत होत असतात व यानिमित्त मोठ्या खेळीमेळीचे वातावरण हे शहरात व जिल्हा तयार होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त एक बैठक चंद्रपूर शहरात पार पडली. शोभायात्रा समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, व उद्योजकीय क्षेत्रात अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेले शैलेश बागला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.व सर्वांनी अनुमोदन देत या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तसेच कार्याध्यक्ष म्हणून रोडमल गहलोत, सचिव म्हणून विनोद उपाध्याय यांची घोषणा करण्यात आली. आगामी योजना, नियोजन करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष रोडमलजी गहलोत, प्रांत सत्संग प्रमुख राकेश त्रिपाठी, व्ही एच पी चे सचिव विनोद उपाध्याय, विजय यंगलवार व सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, युवा, शैक्षणिक, क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. तसेच सोमवार, 11 मार्च रोजी श्रीराम जन्मभूमी शोभायात्रा समिती व शहरातील युवकांची बैठक ही स्थानिक लक्ष्मीनारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या बाजूला, मेन रोड चंद्रपूर येथे ठेवण्यात आली आहे तरी महानगरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, चंद्रपूर तर्फे करण्यात आलेले आहे.