तळा येथे महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर उदघाटन सोहळा संपन्न
✍🏻किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी ९०२८५५८५२९
तळा : -भारतीय बौद्ध महासभा, रायगड जिल्हा दक्षिण विभाग अंतर्गत तालुका शाखा तळा येथे शुक्रवार, दिनांक ०८ मार्च, २०२४ रोजी नालंदा बुध्दविहार, मालूक येथे ५ दिवसीय आणि तळा शहर येथे १० दिवसीय महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन रायगड जिल्हा दक्षिण विभाग महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा अस्मिताताई जाधव यांच्या हस्ते पार पडले.मालूक शिबिराच्या उदघाटनाचे अध्यक्षस्थान भीमराज जाधव तर तळा शहर उदघाटनाचे अध्यक्षस्थान विजय जाधव यांनीभूषविले. याप्रसंगी रायगड जिल्हा दक्षिण विभाग महिला विभागाच्या जिल्हा सरचिटणीस रत्नमालाताई जाधव, कोषाध्यक्षा मनिषाताई मोरे, संस्कार उपाध्यक्षा संगीताताई मोरे ,हिशोब तपासणीस अनिताताई शिर्के, जिल्हा संघटक सारिकाताई नाक्ते, रायगड जिल्हा दक्षिण विभाग विद्यमान सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक संतोष जाधव, माजी जिल्हाअध्यक्ष नितीन मोरे, विजय जाधव, तळा तालुका अध्यक्ष भीमराज जाधव, सरचिटणीस प्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष सुरेश साळवे, संस्कार उपाध्यक्ष नरेश मोरे, महिला अध्यक्षा अर्चनाताई पवार, हिशोबतपासणीस नागराज पवार, संघटक महादेव जगताप, रामदास शिंदे, सुरेन्द्र शेलार, मनोहर गायकवाड, बाळकृष्ण लोखंडे, मंगेश मोरे, लक्ष्मण नाक्ते, मालूक व तळा ग्रामस्थ तसेच महिला मंडळ, संपूर्ण तालुका कार्यकारिणी व महिला शिबिरार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दोन्ही शिबिराच्या सुरुवातीस मानव आदर्शांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन व दिपपूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिकरित्या वंदना, त्रिसरण, पंचशील घेण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा महिला व पुरुष पदाधिकारी यांचे तळा तालुक्याच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन्ही शिबिराच्या ठिकाणी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मालूक येथील शिबिर दि. ८ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत होत असून या ठिकाणी १३ महिला शिबिरार्थीनी नोंदणी केली आहे.या शिबिरासाठी केंद्राकडून संगीताताई तांबे यांची केंद्रीय शिक्षिका म्हणून नियुक्ती केली आहे. तर तळा शहर येथील शिबिर दि.८ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत संपन्न होत असून या ठिकाणी १८ महिला शिबिरार्थीनी नोंदणी केली आहे.या शिबिरासाठी केंद्राकडून मनिषा ताई मोरे यांची केंद्रीय शिक्षिका म्हणून नियुक्ती केली आहे. शिबिर समाप्तीनंतर दि. २० मार्च, २०२४ रोजी चवदार तळे महाड येथे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाण पत्रांचे वाटप होणार आहे.सदरचा शिबिर उदघाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी तळा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, व आभार तालुका सरचिटणीस प्रकाश गायकवाड सर यांनी केले.