कर्जत तालुक्यातील पत्रकारांची पहिली नोंदणीकृत संघटना
कर्जत प्रेस असोसिएशन पत्रकारांच्या हक्कासाठी कटिबद्ध विश्वस्त संतोष पेरणे…
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
कर्जत :- दि.१० मार्च २४ रोजी रॉयल गार्डन कर्जत येथे सायंकाळी ५ वाजत बैठक पार पडली यात कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मादाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे असे जाहीर करण्यात आले. तसेच या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील २७ पत्रकारांचा समावेश आहे असे सचिवान मार्फत सांगण्यात आले.
रायगड धर्मादाय अधिकारी अलिबाग कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे. कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली असे सांगण्यात आले.
कर्जत येथील सिबिसी हॉटेलचे एसी सभागृहात कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक झाली. त्यावेळी प्रिंट,इलेक्ट्रोनिक,यु ट्यूब,वेब पोर्टल आणि डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली.
पत्रकारांच्या हिताकरिता इतर संघटना पत्रकारांना विश्वासात घेत नाहीत जो वाड्यापाड्यांच्यात जाऊन तळा गळात पोहोचून अन्यायाला वाचा फोडतो तोच खरा पत्रकार कर्जत प्रेस असोसिएशन या संघटनेने आम्हाला काम करण्याची संधी दिली त्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू असे मत यावेळी पत्रकार जगदीश दगडे यांनी व्यक्त केले.
संघटनेची कार्यकारणी पत्रकार रोशन दगडे यांनी सांगितली. अध्यक्ष:-भूषण प्रदान, उपाध्यक्ष:- नरेश कोळंबे, संदेश साळुंके, कार्याध्यक्ष:- अभिषेक कांबळे, सचिव:- कैलास म्हामले, खजिनदार:- रोशन दगडे,सल्लागार:- किशोर गायकवाड,
कर्जत तालुक्यातील पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना या संघटनेमध्ये सहभाग घेता येणार असून त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. या पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून पत्रकारांच्या समस्या सोडविल्या जाणार असून दर वर्षी तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले. तसेच (वार्षिक/त्रैमाशीक) पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना बिमा/मेडिक्लेम स्वसंरक्षण दिले जाईल असे नियोजित आहे.. ह्या वेळी उपाध्यक्ष संदेश साळुंके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले…भूषण प्रधान अध्यक्ष,
अभिषेक कांबळे कार्याध्यक्ष, संदेश साळुंके उपाध्यक्ष, नरेश कोळंबे उपाध्यक्ष, कैलास म्हामले सचिव, रोशन दगडे खजिनदार, संतोष पेरणे प्रमुख विश्वस्त,किशोर गायकवाड सल्लागार,नरेश जाधव सल्लागार,प्रभाकर गंगावणे सल्लागार ,दिगंबर चंदणे , अभिजीत दरेकर सहसचिव, जगदीश दगडे सहखजिनदार , गणेश लोट ,कृष्णा सगणे ,विजय डेरवणकर ,
संकेत घेवारे ,नितीन पारधी सदस्य,
अरुण बैकर सदस्य, प्रथमेश कुडेकर सदस्य,रामदास माळी सदस्य,वसंत कदम सदस्य, सचिन भालेराव सदस्य, संजय अभंगे,
रुपेश महागावकर, सतीश पाटील, दिनेश गायकवाड,कायदेशीर सल्लागार, ॲड.कैलास मोरे ,ॲड.श्रीकृष्ण डुकरे