लोणेरे राष्ट्रीय महामार्गच्या मंद गतीने चाललेल्या कामामुळे स्थानिक तसेच प्रवाशांना होतोय वाहतूक कोंडीचा त्रास.

किरण शिंदे
लोणेरे विभाग प्रतिनिधी
8237609655

लोणेरे :- लोणेरे शहर मुख्य बाजारपेठ ठिकाण असून आजूबाजूच्या पहेल, खांडपाले, वडपाले, टेमपाले, वाघोसे, खडकोली, मांगरूळ, भांदरे, रेपोली, तळेगाव, कुरवडे, पन्हळघर, अंबर्ले अश्या २० ते २५ गावातील लोकांसाठी मोठी बाजारपेठ असल्याने मोठ्या संख्येने दुग्धव्यावसायिक, भाजी विक्रेते आणि शेतकरी दैनंदिन कामासाठी येत असतात. बाजारपेठ हायवे लागत असल्याने मोठ्या संखेने अवजड वाहणांची येजा होत असते. सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गच्या कामामुळे लोणेरे मधील वाहतूक अरुंद जागेतून तात्पुरत्या स्वरूपात वाळवण्यात आलेल्या आहेत. मात्र अपूर्ण आणि अरुंद रस्त्याच्या बाजूलाच झालेल्या अतिक्रमणामुळे वाहणांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोणेरे लागत असलेली लोकवस्ती, सोसायट्या आजूबाजूला असलेल्या जे. बी सावंत हायस्कुल, एस. एस. निकम इंग्लिश स्कूल तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब तंत्रशस्त्र विद्यापीठ यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी यांची सकाळ संध्याकाळ रेलचेल पाहायला मिळते आणि यातून छोटे छोटे व्यावसायिक, भाजिविक्रेते, दुधविक्रेते, स्थानिक, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून वाट काढतांना दमछाक होते.
राष्ट्रीय महामार्गाचे मंद गतीने चालू असलेले काम, अर्धवट सोडलेले सर्व्हिस रोड रस्त्यालगत वाढू लागलेले अतिक्रमण या बद्दल व्यावसायिक, स्थानिक आणि प्रवाशी यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी रस्त्यातिल अतिक्रमण लोणेरे ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी लवकरात लवकर यावर योग्य ती कारवाई करावी तसेंच संबंधिक ठेकेदाराने प्रथम सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुस्थितीत करावेत अशी व्यावसायिक, स्थानिक लोक तसेच प्रवाशांची मागणी आहे..