रस्त्यांवरील धूळ स्वच्छ करा अन्यथा आंदोलन : आम आदमी पार्टी

रस्त्यांवरील धूळ स्वच्छ करा अन्यथा आंदोलन : आम आदमी पार्टी

रस्त्यांवरील धूळ स्वच्छ करा अन्यथा आंदोलन : आम आदमी पार्टी

🖋️साहिल सैय्यद……
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस – चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घुग्घुस शहर ओळखला जातो
या प्रदूषणाला कारणीभूत शहरातील कंपन्या आहेत

या कंपन्या मध्ये लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी , अदानी सिमेंट कंपनी आणि वे.को.ली वणी क्षेत्र (कोळसा खानी ) सर्व कंपन्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरला असून यामुळे नागरिकांना विविध स्वरूपाचे आजार झालेले आहेत
या आजारा मध्ये दमा,अस्थमा,खोकला,त्वचारोग,डोळ्याचा त्रास,हृदयाघात, असे अनेक आजारांचा समावेश आहे

या कंपन्याच्या जड वाहतुकीमुळे बौद्ध शमशान भूमी ते प्रियदर्शनी कन्या महाविद्यालय,घुग्घुस शाळा पर्यंतच्या रोडावर सुद्धा धुळाचा थर बसला असते.
घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देखील मार्गाने येणं जाणं करतात परंतु या गंभीर प्रकरणाकडे कधीच लक्ष देत नाही

नगर परिषदेने कुंभकर्णाच्या झोपेतून बाहेर येऊन सामान्य जनतेच्या हितासाठी काम करावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे अध्यक्ष इंजी.अमित बोरकर यांनी केली असून हा मार्ग गावामध्ये येण्या-जाण्याकरिता एकमेव मार्ग आहे दररोज शाळेचे मुलं, कामावर जाणारी माणसं, किंवा कुणालाही कुठे जायचे असेल तर या मार्गाचा वापर करावा लागतो म्हणून या मार्गा वरील धूळ जर दोन दिवसात साफ करून रोडावर टॅंकरने पाणी मारायचे काम जर सुरू झाले नाही तर येणाऱ्या १५/०३/२०२४ रोजी (तीन दिवसानंतर ) आम आदमी पक्षातर्फे घुग्घुस पोलीस स्टेशन सामोरील चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा आप तर्फे देण्यात आला

यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here