कल्याण मध्ये मसाज च्या नावाखाली बिनधास्त वेष्या व्यवसाय पोलिसांनी केला पर्दाफाश …….
मुंबई कल्याण प्रतिनिधी
हिरामण गोरेगावकर
मुंबई :- सध्या महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना सुरू आहेत या वर कोणती नियंत्रण काम करते अस सध्या तरी दिसून येत नाही .अशातच कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथे मसाज केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविल्या जात असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. खडकपाडा सर्कलमधील मिडास वेलनेस स्पा येथे छापा टाकून केंद्र चालक, व्यवस्थापक आणि एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या केंद्रात अवैध धंदा सुरू असल्याची पुष्टी केली. महिलांना जबरदस्तीने शरीर संबंधास प्रवृत्त करून पैसे कमावले जात असल्याचे समोर आले आहे.
