गडचिरोली : अर्थसंकल्पात 500 कोटींच्या प्रकल्पांसह ‘स्टील हब’ची घोषणा

गडचिरोली : अर्थसंकल्पात 500 कोटींच्या प्रकल्पांसह ‘स्टील हब’ची घोषणा

✍️लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9545491059

गडचिरोली : राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून, जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या खनिकर्म महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.

याशिवाय, आरमोरी येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे. तसेच, दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून 7,500 नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.

विदर्भातील विमानतळ विकासाच्या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू झाली आहेत.

गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या घोषणांमुळे जिल्ह्यात उद्योग, वाहतूक आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.