शिवगर्जना ग्रामिण टेनिस क्रिकेट असोसिएशन विभाग दहिवली
आयोजन: जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞7208708456📞
माणगाव : सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक ०९/०३/२०२५ रोजी शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन विभाग दहिवली आयोजन : जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली
या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर असोसिएशन चे संस्थापक मा. श्री. नरेश सत्वे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र गाडे व अन्य पदाधिकारी तसेच दहिवली गावचे श्री. अध्यक्ष नरेश सत्वे व दहिवली गावचे पोलिस पाटील मा. श्री. चंद्रकांत जी चेरफले साहेब व श्री. राजाराम करकरे श्री. गणेश करकरे व अन्य पदाधिकार सभासद .
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार मा. श्री. सुरेशजी करकरे यांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन दहिवली गावचे अध्यक्ष श्री .नरेश सत्वे व दहिवली गावचे पोलिस पाटील मा.श्री.चंद्रकांत चेरफले साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
या स्पर्धेत एकूण १६ संघाचा समावेश होतो प्रत्येक कर्णधारास सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली तसेच दृतिय क्रमांकाचे मानकरी पद्मप्रसाद काचले. तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री काळभैरव दहिवली. चतुर्य क्रमांकाचे मानकरी वडवली बौद्धवाडी. तसेच उत्कृष्ट फलंदाज नरेश शिंदे . उत्कृष्ट गोलंदाज भावेश भोस्तेकर तसेच स्पर्धेचा मालिकावीर श्री अंकेश डवले .
या स्पर्धेमध्ये समालोचकची भुमिका बजावली ते मा. श्री .मिलिंदजी शिर्के सर व मा. श्री. विनोदजी करकरे साहेब तसेच पंचांची भुमिका निभावत होते ते माजित सांगले.
हि स्पर्धा निर्विघ्न यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली व समाज मित्र परिवार चे कार्यकारणी मंडळी, स्वयंसेवक, सहभागी संघ आणि देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले