घे भरारी महिला ग्रुप तर्फे रांजणखार येथे जागतिक महिला दिन संपन्न.

घे भरारी महिला ग्रुप तर्फे रांजणखार येथे जागतिक महिला दिन संपन्न.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-घे भरारी महिला ग्रुप तर्फे रांजणखार येथे जागतिक महिला दिन संपन्न झाले या दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होत.महिलांसाठी मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले, तसेच गावातली इयत्ता १० वी १२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून अँड. जीविता पाटील स आध्यक्ष तेजस्विनी फाऊंडेशन , चिंचवली ग्रामपंचायत सदस्य राजेश विद्याधर म्हात्रे, ग्रामस्थ विजय बालराम म्हात्रे, सत्यवान पाटील,मधुकर पाटील, विलास म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
अँड. जिविता पाटील यांनी महिलाना महिला कायदे व व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले.या वेळी रांजणखार गावातली कृतिका पाटील हिने हिरकानीचा सुंदर प्रसंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली एकंदरीत हा कार्येक्रम यशस्वी करण्या साठी घे भरारी महिला ग्रुप सौ. कांचन म्हात्रे,सौ. वृषाली म्हात्रे ,सौ. श्रुतिका पाटील,कु. निशा पाटील ,सौ. विश्रांती पाटील, सौ. रुपाली पाटील ,सौ. निलिमा पाटील,सौ. रुचिता म्हात्रे ,सौ. मानसी पाटील,सौ. स्वेतली पाटील,सौ. अर्चना म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.सपूर्ण कार्यक्रमाचे पी सूत्रसंचालन सौ.कांचन मच्छिंद्र म्हात्रे आणि अर्पिता हिने केले .या वेळी महीलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.