बनावट नकाशाच्या आधारे केलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा.

बनावट नकाशाच्या आधारे केलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा.

 

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव,मालाड, बोरिवली,अंधेरी, विले पार्ले, बांद्रा,चेंबूर आणि कुर्ला यांच्या प्रत्येक भागात बनावट नकाशाच्या आधारे सी आर झेड आणि एन डी झेड क्षेत्रामध्ये उभारलेल्या अनधिकृत बांधकामनवर तोडक कारवाई केली जाणार आहे. व तेथील बांधकामची बनावट नकाशे केलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

भाजप आमदार. विक्रांत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.पालिकेच्या उप आयुक्त परिमंडळ कार्यालय 7,5,4,आणि 3 मध्ये बनावट नकाशे तयार करून बांधकामे करण्यात आली होती.हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी उपधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह सात खाजगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

20 ते 22 मिळकत धारकांनी दिवाणी न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. मात्र उर्वरित बांधकाम राज्याचे मुख्यमंत्री. श्री. देवेंद्र फडवणीस साहेबांशी चर्चा करून तेही पाडण्यात येईल, अशी ग्वाही माननीय महसूल मंत्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी, आमदार. विक्रांत पाटील साहेबांना विधान परिषदेत देऊन त्यांना अशस्वाशीत केले.