मुंबईत उष्णतेची लाट, पारा 40 अंशावर, नागरिकांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे निर्देश.

मुंबईत उष्णतेची लाट, पारा 40 अंशावर, नागरिकांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे निर्देश.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- मागच्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. होळी होण्याच्या आधीच एवढी उष्णता झाल्याने त्याची झळ मुंबईकरांना प्रचंड प्रमाणात सोसावी लागत आहे. आज उष्णतेची तीव्रता 40 अंशावर होती. प्रचंड उष्णता मुंबई मधे सध्या झालेली दिसून आली.

उष्णतेची दखल घेत बृहमुंबई महानगर पालिकेने मुंबईकरांना उष्माघाताने कोणाला त्रास होऊ नये या साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमांनामुळे उदभवणारी समस्या म्हणजे उष्माघात, हा आजार खूप गंभीर असून त्यापासून रक्तदाब कमी होऊन त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो, व असे झाल्यास त्याला प्रथम वैधकीय उपचारची गरज असते. उष्णतेमुळे शरीरावर घाम येऊन त्वचेचे आजार, घामोळे, शरीराची दुर्घधी, घामामुळे गचकर्ण, असे विविध प्रकारचे त्वचेचे आजार होऊ शकतात.

तसेच रोजच्या आहाराकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार पाणी पिणे, घसा कोरडा पडतो म्हणून शीतपेय पिऊ नये, उन्हाळ्यात अन्नपचायला थोडं जड असतं, म्हणून आहार एक घास कमी खावे, त्यासोबत कैरी पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, दही, लस्सी इत्यादी पेय प्यायल्यास शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते, व ते शरीरास लाभदायक ठरतात. शक्यतो बाहेरचे मसाले व तेलकट पदार्थ टाळावे.

घामोळ्याचा त्रास कमी होण्यासाठी रोज थंड पाण्याने अंघोळ करावी. घराबाहेर पडताना डोळ्यांवर सन गॉगल लावणे, डोक्यावर टोपी किंव्हा छत्री, कॉटन चे फुल्ल हाताचे सुती कपडे, पायमध्ये शूस, मानेवर ओला केलेला कपडा ठेवणे आवश्यक आहे. तसेच पातळ व सैल कपडेच परिधान करणे गरजेचे आहे. त्वचेवर सन क्रीम लावणे फायद्याचे ठरते. शक्यतो आहारामध्ये संत्री मोसंबी, पाले भाज्या, शेंगदाणे तृनधान्य
यांचा समावेश असावा. उन्हाळ्यात आपली त्वचा जपण्याचे आपली जवाबदारी आहे.

अशी मार्गदर्शिका सूचना मुंबई महापालिकेकडून देण्यात आल्या असून, त्यावर मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्याने घेणे तेवढेच गरजेचे आहे. उष्णतेमुळे व उष्माघाताने वाचण्यासाठी हे उपाय केल्यास उष्णतेचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल, व पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात सर्व जण आपापली स्वतः काळजी घेतील असा विश्वास महापालिकेने मुंबईकरांवर व्यक्त केला आहे.