चेन्नई

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने कोलकाता नाइट रायडर्सवर थरारक विजय प्राप्त करून घरच्या प्रेक्षकांसमोर दमदार ‘कमबॅक’ केलं. या सामन्यात धावांचा रतीब घातला गेला. दोन्ही संघांमध्ये ‘षटकारांचा सामना’ पाहायला मिळाला. सामन्यात तब्बल ३१ षटकार ठोकले गेले. यातील १७ षटकार कोलकाताच्या फलंदाजांनी ठोकले, तर चेन्नईच्या खात्यात १४ षटकारांची नोंद केली गेली. षटकार ठोकल्यावर मिळणाऱया सहा धावांऐवजी आठ धावा मिळायला हव्यात अशी अजब मागणी धोनीने यावेळी केली.

धोनीची ही मागणी ऐकून तुम्ही विचारात पडला असाल, तर झालं असं की, सामना संपल्यानंतर जिंकलेल्या संघाच्या कर्णधाराला त्याचं मत विचारण्याची पद्धत आहे. त्यानुसार सुत्रसंचालक हर्षा भोगलेच्या प्रश्नांना धोनीने उत्तरे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here