65 वर्षीय महीलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.
✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
वडनेर,दि.11 एप्रिल:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात येणा-या पिपरी येथे एका 65 वर्षीय महीलेले विहीरीत उडी घेउन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे आहे.
प्राप्त माहितीनुसार पिपरी येथे राहणा-या विठावाई नामदेव इंगोले वय 65 वर्ष यांनी गावातील सार्वजनिक विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. मृतक महिला या अनेक दिवसा पासून आजाराने त्रस्त होत्या, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याची बोलले जात आहे.
मुलाने दिलेल्या माहिती नुसार मृतक विठाबाई या घरी दिसून आल्या नाही, त्यामुले त्याचा मुलाने आईचा शोध घ्यायला सुरुवात केली पण शोध लागत नव्हता. त्यामुळे सुनील राऊत यांचा घरासमोर असलेल्या सार्वजनिक विहीरीत गळ टाकुन बघितले असता त्याचा मृतदेह विहीरीत आढळून आला. या घटने नोंद करुन पुढील तपास वडनेर पोलिस करत आहे.