हिंगणघाट भाजी विक्रेत्यांनी केला ग्राहाकावर लोखंडी राँडने हल्ला.

✒प्रशांत जगताप प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- येथे एक भाजी विक्रेत्यांनी एका भाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहाकावर लोखंडी राँडने हल्ला केल्याने बाजारात एकच खळबळ माजली होती.हिंगणघाट येथील साप्ताहिक शुक्रवार बाजार परिसरात एका युवकाने भाजी विक्रेत्यांला 15 ऱुपये किलोचा भावात टमाटर मागितलामुळे संतापलेल्या भाजी विक्रेत्यांने लोखंडी राँडने ग्राहाकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

भाजी घेण्यासाठी आलेल्या जखमी ग्राहकांचे नाव गजानन वैरागडे असे आहे. तो भाजीपाला विकत घेण्याकरिता साप्ताहिक शुक्रवार बाजारात गेला होता. तेथे त्याने भाजी विक्रेत्यांला 15 रुपये किलो भावाने टमाटर मागितले, त्या कारणाने भाजी विक्रेत्यांनी शाब्दिक वाद उत्पन्न करुन वजनकाटा लावण्याकरिता वापरण्यात येणारी लोखंडी सळाख काढून गजानन वैरागडे यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले .ही घटना अनेकांनी पाहिली. शुक्रवार बाजार मधे गजाननचा मित्र आकाश तेथे आला व त्याने जखमी गजाननला दुचाकी वाहनांने रुग्णालयात दाखल करण्यात करून. मारहाणीची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यवसायिका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here