तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजन.
तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजन.

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजन.

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजन.
तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजन.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी ✒
नागपुर:- नुकत्याच झालेल्या तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 या स्पर्धेमध्ये उमरी पोतदार
(ता. पोंभुर्णा जि.चंद्रपूर ) हे एक मागासलेला अतिघनदाट जंगल असलेला गाव येथील मुलांनी विजयी होऊन स्वतः सोबत गावाचे नाव उंचावले. या स्पर्धेत एक गोल्ड दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पाहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त केली. याचा संपूर्ण श्रेय या मुलांना घडवणारे मास्टर मुकेश तांडेकर यांना जातो. हे एक पोलिस कर्मचारी असुन सुध्दा वेळेत वेळ काढून मुलांना योग्य मार्ग दाखवून आज नॅशनल चॅम्पियन बनवले योग्य दिशा दाखवणारे असेल तर यशस्वी मार्गाने वाटचाल होते आणि मिळते ते म्हणजे ‘यश’. या स्पर्धेत सहभागी झालेले उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा) येथील मुले कोमल पेंदोर, अंकुश उराडे, स्वप्नील ठाकरे, महेश कुलमेथे, अमित कुंभरे, वैभव ठाकरे, आशिष साउलकर, अजिंक्य कुंभरे, अनिल सतार यांनी सहभाग होऊन मुलांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांनी विजय संपादन करून मिळवले.

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजक मास्टर प्रवीण रामटेके यांनी कोरोना सारख्या विषाणूचा संक्रमण होऊ नये म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या होत्या व आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित करून ही स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडली. या स्पर्धेमध्ये बाहेरून आलेल्या टीम ने सुद्धा आपले कला दाखवली, शेवटी स्पर्धा आहे कोणी जिंकतो तर कोणी हरतो. मेहनत करेल, जो करत राहणार मेहनत त्याला शेवटी यश मिळतोच हेच उमरी पोतदार च्या मुलांनी आज या स्पर्धेमध्ये विजयी होऊन दाखवून दिले आहे.

या मुलांचा सत्कार, मान सन्मान म्हणून गावातील उमरी पोतदार येथील ठाणेदार साहेब सरपंच व सदस्य, तसेच गावकऱ्यांनी विजयी झालेल्या सगळ्या मुलांचा या प्रसंगी स्वागत करण्यात आला. यामध्ये उमर पोतदारचे ठाणेदार सहित सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, उपसरपंच मंगेश उपरे व अनिल पेंदोर ठावुरदास उराडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here