नागपुर जिल्हात 15 वर्षीय नाबालीक मुलीवर लैंगिक अत्याचार.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/कुही,दि.11 एप्रिल:- नागपुर जिल्हातील कुही येथे एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घरात कुणालाही न सांगता घरा बाहेर गेलेल्या एका नाबालीक मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नाबालीक मुलीवर अत्याचार करणा-या नराधम आराेपीला कुही पाेलिसांनी अटक केली आहे.

नाबालीक मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीच नाव गणेश फिरत शाहू वय 29 वर्ष, रा. आनंदवन, सूरगाव, ता. उमरेड असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कुही शहरातील 15 वर्षीय मुलगी घरात कुणालाही न सांगता घरा बाहेर गेली हाेती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी तिला पळवून नेल्याची तक्रार पाेलिसात नाेंदविली हाेती. त्यानंतर काही दिवसांनी ती घरी परत आली. त्या वेळी तिने गणेशने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेत पाेलिसात तक्रार दाखल केली. तिच्या जबाबावरून कुही पाेलिसांनी भादंवि 376 (2) एन, जे, 376 (3), पाेक्साे 2012 सहकलम 3 (1) डब्ल्यू (1) (2) 3 (2) 5 (अ), 3 (2) (5) अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here