किन्ही/मोखे- सतलवादा ते विर्शी रोड अर्धवट बांधकामामुळे बनला आहे अपघातांचे केंद्र

किन्ही/मोखे – सतलवादा ते विर्शी रोडचे काम अजूनही प्रलंबित

किन्ही/मोखे- सतलवादा ते विर्शी रोड अर्धवट बांधकामामुळे बनला आहे अपघातांचे केंद्र

नंदकुमार पडले
११ एप्रिल, साकोली: ग्राम किन्ही/मोखे – सतलवादा ते विर्शी रोडाचे काम सदर ठेकेदाराने डिसेंबर २०२१ पासून रोडच्या बाजूचे खोदकाम करून ठेवले त्या नंतर तब्बल 4-5 महिने लोटूनही सदर काम जसेच्या तसेच खोदलेले सदर खोदकामामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता आहे, तरीपण सदर कामाची चौकशी करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी कळकळीची विनंती किन्ही/मोखे ग्रामवासी शासनाला करत आहेत. अन्यथा गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या मनःस्थितीत आहेत.

या मार्गावर अर्धवट कामामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. साकोली ते कोसनटोडी ते गोदींया शॉर्टकट मार्ग म्हणून ओळखला आहे आणि मालवाहतूक आणि व्यापारी वाहतुकीसाठी हा मार्ग मुख्यतः वापरला जातो. त्यामुळे परिसरातील व्यवसायांच्या प्रगतीसाठी या मार्गाचा विकास करावा, अशी मागणी ग्रामपंचायत किन्ही मोखे येतील सदस्य वाल्मिकी नंदेश्वर व नंदकुमार पटले यांनी केली आहे.

वाल्मीक नंदेश्वर ग्राम पंचायत सदस्य किन्ही/मोखे रहिवासी असलेले विश्र्वदीप साखरे अंकित रामटेके सौरभ उंदिरवाडे अभिषेक रामटेके महेंद्र उके महेश शेलारे विजय शेलारे देवानन उंदिरवाडे गौतम रामटेके नानेश्वर वालखे होमराज वाळखे तथा सर्व किन्ही ग्रामवासियांची सदर समस्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here