मौजा कान्हळगाव येथील भव्य महिला कबड्डी स्पर्धा संपन्न
विविध जिल्ह्यातील १६ चमूंनी केली नोंदनी
कबड्डी प्रेमी यांची हजारोच्या संख्येत दाटली गर्दी
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा कान्हळगाव येथे दिनाक ९ एप्रिल २०२२ रोज शनिवार ला विदर्भस्तरीय भव्य महिला कबड्डी स्पर्धा जिल्हा परिषद पूर्व माध्यमीक शाळा कान्हळगाव ( सिरसोली ) येथे आयोजीत करण्यात आली होती. या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रामुख्याने उद्घाटिका म्हणून लाभलेले सौ रंजीता राजुभाऊ कारेमोरे, कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून लाभलेले मा. मधुकरजी कुकडे ( माजी खासदार ) साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. कबड्डी स्पर्धा प्रसंगी विविध जिल्ह्यातील १६ चमूंनी नोंदनी केली होती. त्यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी सौ अनिता नलगोपूलवार ( जिल्हा परिषद सदस्या ) सौ. भारती नीमिरमारे, सौ. प्रतिभा राखडे, सौ. सुमन मेहर, सौ. कांचन निंबार्ते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता, व ग्रामवासी, विद्यार्थीनी, शिक्षकगण, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उद्घाटीका यांनी आपल्या भाषणात लोकांना व संपूर्ण कबड्डीपटूंना मार्गदर्शन करताना असे सांगीतले की कबड्डी खेळाची सुरुवात तज्ञांच्या मते असे की महाभारताच्या काळात अभिमन्युने या खेळाची सुरुवात केली होती. काही जाणकाऱ्यांच्या मते कबड्डी हा खेळ भारतात सुमारे ४००० वर्षापासुन खेळला जात आहे. आपल्या भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने हा खेळ खेळला जात आहे. महाराष्ट्रात हुतूतू… बंगालमध्ये हुडूडू… चेन्नईत चेडूयुडू… केरनमध्ये वंडीवडी… उत्तरभारतात कोनवरा, साबरगण्णा… पंजाब राज्यात झाबर गंगा, सौची पक्की अश्या वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच पण या खेळाला सर्वदुर एकच नाव असावे या करिता जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते महाराष्ट्र राज्याने केले आहेत.
अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाऊन भारतात हा खेळ कबड्डी या नावाने ओळखला जातो. त्यांचे श्रेय महाराष्ट्र राज्याला द्यायला हवं, मराठी माणसांनी प्रयत्नपुर्वक कबड्डी खेळातल्या विविधतेतून आपल्या राज्यात एकता निर्माण केली.
महाराष्ट्राने जो नियम या खेळाकरीता निश्चित केले होते त्या नियमांनुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळला जाऊ लागला. पुढे कबड्डीच्या प्रचारा आणि प्रसाराकरिता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेली या खेळाने देशाच्या कक्षा ओलांडल्या कबड्डीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अनेकांनी मेहनत घेतली. १९९० ला बिजींग येथे पार पडलेल्या एशिआई स्पर्धापासुन एशियात कबड्डी ला समाविष्ट करण्यात आले. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे महाराष्ट्र राज्याचे मोठा योगदान आहे.
आणखीनच एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव खेळ आहे की या खेळात पुरुष आणि महिला अश्या दोनही भारतीय संघाने विश्वकप जिंकला आहे. कबड्डी या खेळासाठी कोणत्याही वस्तू विकत आणावे लागत नाही. त्यासाठी कोणताच खर्च करावा लागत नाही. गरीब श्रीमंत सर्व मुली हा खेळ खेळु शकतात.
कबड्डी खेळल्याने आपला शरीर नेदरूस्त राहते. महाराष्ट्रात शिमगा होळी सनाच्या वेळी हा खेळ खेळला जात असे. प्रामुख्याने अखाड्यात व नालमीत हा खेळ खेळला जात असे. मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. हळूहळू क्रिकेट खेळा सारखाच कबड्डी खेळाचा सामना होऊ लागला. आणि कबड्डी खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे मार्गदर्शन केले. व कार्यक्रमात आभार व्यवत्त करूण आपले बोलने थांबविले.
व आयोजक मंडळांनी बक्षिस वितरण करून खेळाडूचे कौतुक करूण कार्यक्रम संपविण्यात आले