आकाश पिकलमुंडे यांची दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कबड्डी संघाच्या सराव शिबिरासाठी निवड
आकाशने पुन्हा एकदा मोहाडी वासीयांची मान उंचावून पुन्हा आकाशात गवसणी घातली
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
भंडारा :- विदर्भातील भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील प्रदिर्घ काळापासुन कबड्डी या खेळासाठी समर्पित झालेला आकाश पिकलमुंडे यांनी पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. आकाशला लहानपणापासुन कबड्डी या खेळाचा छंद होता. त्यांचे वडील देखील कबड्डी पट्टू होते.
त्यांच्या आई वडिलांची इच्छा भारतीय कबड्डी संघामध्ये आकाशला खेळताना पाहावं अशी इच्छा होती. ती इच्छा आकाशने पूर्ण केली. त्यांच्या आई वडीलांनी आकाशचं कौतुक केले आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कबड्डी संघाच्या सराव शिबिरासाठी आकाश पिकलमुंडे यांची निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी पुन्हा ही एक गौरवपूर्ण बातमी आहे. विदर्भ एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आकाश पिफलमुंडे ११ एप्रिल ते १ में दरम्यान दिल्ली येथील ईंदिरा गांधी स्टेडियम येथे सुरु होणाऱ्या भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या शिबिरात दाखल होणार आहे. या सराव शिबिरात विविध राज्यातील ४३ कबड्डीपटू सामील होणार आहेत.
या शिबिरात विदर्भातून आकाश पिकलमुंडे हा एकमेव खेळाडूंची निवड केली गेली आहे. तसेच महाराष्ट्रातून ६ खेळाडू सराव शिबिरात भाग घेणार आहेत. सराव शिबिरातून १२ कबड्डी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
निवड झालेले अंतिम १२ खेळाडू २०२२ मध्ये होणाऱ्या एशिया कप भारतीय संघ खेळणार आहे. भारतीय कबड्डी संघात आकाश पिकलमुंडे यांची निवड व्हावी. यासाठी मोहाडीकरांनी व त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी आकाश पिकलमुंडे प्रो – कबड्डी लिगच्या आठव्या हंगामासाठी बंगाल वॉरिअर या संघात खेळला होता. आकाश पिकलमुंडे हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेला आहे. विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर स्वताची ओळख निर्माण केली गेली आहे. त्याचे भारतीय कबड्डी संघात कबड्डी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता कबड्डी प्रेमींनी संघात १२ मध्ये निवड व्हावी अशी आशा मोहाडीकरांना लागली आहे. अशी अपेक्षा बाळगून त्यांच्या चाहत्याने आकाश पिकलमुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहे.