ज्योतीन काढली शाळा बघा ती
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
कविता………
( चाल – माझा नवीन पोपट हा….)
ज्योतीन काढली शाळा बघा ती
मुलींना शिकवल्या अडानी किती
शिकून-सवरून शहाणी झाली
आठवण सदा ती
ठेव आठवण सदा ती
तो महान महात्मा नको विसरूस कदापि //धृ//
डॉक्टर वकील फुल्यां मुळेच
टीचर बाबू फुल्यांमुळेच
पटपट बोलतो ऐटीत चालतो
करून घे कापी त्याची करून घे कापी
तो महान महात्मा नको विसरूस कदापि//१//
शिकविण्या भेटेना टीचर त्यांना
शाळेची खोली भेटेना त्यांना
पत्नीला स्वतः शिकविले शेता
क का कू कू की
तो महान महात्मा नको विसरुस कदापी//२//
पाण्याचा केला हौदच खुला
पिण्याचे पाणी देई शुद्राला
पिऊन पाणी आनंद मनी
ठेविली माणुसकी त्याने ठेविली माणुसकी
तो महान महात्मा नको विसरुस कदापी//३//
विषमता वाद्यांना सळो की पळो करून सोडणारे स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच वागणूक देणारे त्यांच्यासाठी शाळा काढणारे महान ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा…….
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधुन काढणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे, स्त्रि शिक्षण, समानता व सत्यासाठी देह झिजविणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…