हैदरबागच्या मनपा दवाखान्यात डिजीओ कोर्सला मान्यता
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760
शहराची झपाटयाने लोकसंख्या वाढत आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याकडे मनपाने विशेष लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता हैदरबाग येथील दवाखान्यात डिजीओ कोर्सला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे शहराच्या आरोग्यसेवेत मोठी भर पडणार असून महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेले प्रयत्न व महापौर जयश्रीताई निलेश पावडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आरोग्य सेवेस बळ मिळाले आहे.
महापालिकेचे नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पूर्वीपासूनच कल राहिला आहे. २००८ मध्ये झालेला गुरू-ता-गद्दी सोहळा व त्यानंतर शहराचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेत झालेला समावेश त्यामुळे शहरातील अनेक योजना मार्गी लागल्या. याच काळात आरोग्य सुविधाच्या बळकटीकरणावर लक्ष देण्यात आले. नांदेड शहरातील शिवाजीनगर व हैदरबाग या दोन ठिकाणी भव्य नागरी आरोग्य सुश्रुषा केंद्र उभारण्यात आले. या दवाखान्यात दररोज शेकडो रूग्णांवर उपचार केल्या जातात. अद्यावत यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेल्या या दोन्ही दवाखान्यांनी कोविडच्या काळात कौतुकास्पद अशी भूमिका वठवली.
शहरातील महिलांच्या वाढत्या आरोग्यविषक समस्या लक्षात घेऊन मोफत किंवा माफक दरात महिलांवर उपचार करावेत यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, विधान परिषदेतील गटनेते आ.अमरनाथ राजूरकर व आ.मोहन हंबर्डे यांनी नांदेड येथील निव�