श्रीवर्धन रायगड.येथील वारंवार विज पुरवठा खंडीत होऊन होणाऱ्या गैरसोई बाबत निवेदन.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन : – महोदय, उपरोक्त विषयाला अनुसरून निवेदन देऊ इच्छितो की, महावितरण तर्फे आपल्या विभागातील विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. वातावरणातील तापमान एवढे वाढले असतांना विज पुरवठा दिवसा, रात्री कोणतीही पुर्व सुचना न देता खंडीत होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ चालू असून मुलांना अभ्यासाकरिता ऐन परीक्षेमध्ये नाहक त्रास होत आहे. तसेच या महिन्यामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र सण असुन त्यांच्या सणासुदीलासुध्दा विजेमुळे अडथळे येत आहेत. तसेच लहान मुले, वयोवृध्द माणसे तसेच कृषी पंप वापरणारे सर्व शेतकरी आणि पोल्ट्रीधारक यांना सुध्दा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सतत अनियमित खंडीत पुरवठयामुळे घरातील विद्युत उपकरणांवर सुध्दा परिणाम होत आहे.
विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार असाच पुढे चालू राहिला तर नाईलाजास्तव शिवसेना स्टाईलने सर्व शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणाची असेल याची नोंद घ्यावी.