पत्रकारांच्या नावाने पैसे हळपणारा “कमिशन खोर” वाळू माफिया सक्रिय…!
मोठया पुढाऱ्याचा जवळीक म्हणून तो लबाड कोल्हा सर्वत्र परिचित
क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500
ब्रम्हपुरी :-पिंपळगाव, आवळी, चिकलढोकळा व बेलगाव येथील रेती घाटावरून जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या वजनदार नेत्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील “कमिशन खोर” कार्यकर्त्याने वाळू तस्कर, भूखंड माफिया, मुरुम उत्खनक, लबाड कोल्हा म्हणुन सर्वत्र परिचित असलेल्या या मोठया नेत्याच्या जवळच्या व्यक्तिने समाजाचा आरसा , दर्पण म्हणुन ज्यांना ओळखल्या जातो त्या पत्रकारांच्या नावाने पिंपळगाव येथील रेती घाटावरील रेती तस्कर मालकाकडून मोठी रक्कम घेउन लबाड कोल्हा पसार झाला आहे. मात्र हा त्याचा पत्रकारांना बदनाम करण्याचा डाव असून याबाबात सर्वांना महिती झाल्याने त्या “कमिशन खोर” बाबत सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील बऱ्याच वाळू घाटाचे लिलाव झालेले असून शासकीय नियमावलीनुसार वाळू उत्खनन करणे हे त्या वाळू घाट मालकावर बंधनकारक नियमावली आहे. मात्र बऱ्याच वाळू घाटावरून नियमाच्या बाहेर जावून सर्व नियम पायदळी तुळवत आठ ते दहा फूट खोल वाळू अवैधपणे उत्खनन करून राजरोसपणे महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने दिवसा ढवळ्या व रात्र कालीन एक ते दोन ब्रास रॉयल्टी नाममात्र काढून ओवरलोड हायवा ट्रक द्वारे नागपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील वाळू जात आहे. त्याच प्रमाणे एक ब्रास वाळूची रॉयल्टी साडेपाच हजार रुपये किंमत असतांनाही या भागातील ट्रॅक्टर धारक ब्रह्मपुरी मध्ये अठराशे ते दोन हजार रुपयांमध्ये बांधकाम करणाऱ्या बांधकाम मालकांना वाळू टाकत आहेत यावरून याचे अर्थ तंत्र काय असावे हे समजून घेण्यासारखेच असून या भागातील महसूल अधिकार्यांना याबाबत काही सुतक नसल्याचेच जाणवते .
विशेषतः या भागातील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षनेते सुद्धा गांधारीची भुमिका घेऊन बसलेले आहेत त्यामुळे या नेते मंडळींकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ झाला असावा म्हणून लोकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.मात्र जिल्ह्यातील मोठा नेता असलेल्या व्यक्तीच्या जवळीक समजल्या जाणाऱ्या व तालुक्यात सर्वांना परिचित असलेल्या कमीशन खोर, भूमाफिया,रेती तस्कर म्हणूनही परिचित असलेल्या तालुक्यातील या कार्यकर्त्याने पत्रकारांच्या नावाने पैसे उखडून लबाड कोल्ह्या सारखे पसार केल्याने याची नियत काय हे त्याने सिद्ध करून दाखविल्याचे स्पष्ट होत असून या वाळू माफिया बद्दल सर्वांनाच माहीती झाल्याचे समजत असून याबाबत सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.