आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथे श्री रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी.
” जय जय श्रीराम नामाच्या जयघोषात दुमदुमली चिमूर नगरी.”
श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित भव्य-दिव्य शोभायात्रेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या समवेत मोठ्या संख्येने श्री रामभक्तगण सहभागी.
गणेश गभने
चिमूर तालुका प्रतिनिधी
7798652305,8788618495
चिमूर : – दि. १० एप्रिल/ आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर येथे श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित भव्य-दिव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण चिमूर शहरात शोभायात्रेमध्ये पायी चालत समस्त श्री रामभक्तगणांना श्री रामनवमी च्या मंगलमय शुभेच्छा दिल्या व वार्तालाप केला आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला.
सदर श्री रामनवमी महोत्सव २०२२ ला दि. ९ एप्रिल पासून नेहरू विद्यालय चिमूर च्या भव्य पटांगणात आ. बंटीभाऊ भांगडीया आयोजित प्रसिद्ध समाज प्रबोधनकार, व्याख्याते, युवा कीर्तनकार मा. सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान व तांडव क्रियेशन नागपूर प्रस्तुत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या महानाट्याने प्रारंभ झाला.
दि. १० एप्रिल ला आयोजित भव्य-दिव्य शोभायात्रेने सदर महोत्सवाची सांगता झाली. आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी श्री रामभक्तगणांसमवेत भगवान श्रीराम यांच्या नामाचा जागर केला व ढोल-ताशा पथकातील लहानग्यांसोबत सवांद साधला आणि उपस्थित माता-भगिनी व युवा तथा ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांसोबत श्री रामनवमी निमित्त छायाचित्रण केले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, माजी नगरसेवक सतीश जाधव, संजय नवघडे, भा.ज.यु.मो. शहराध्यक्ष बंटी वनकर, भा.ज.यु.मो. शहर महामंत्री अमित जुमडे, राकेश झिरे, निखिल भुते, आशु झिरे, श्रेयस लाखे, कुणाल कावरे, सौरभ बडगे व इतर सर्व भाजपा, भा.ज.यु.मो पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक श्रीरामभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.