शरद पवारांच्या घरावर भ्याड हल्ल्याचा हिंगणघाट येथे महा विकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात महा विकास आघाडीच्या वतीने कारवाई करण्याबाबत दिले निवेदन.
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट:- ११ एप्रिल २०२२
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील ‘ सिल्वर ओक ‘ निवास स्थानी बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्लयाचा निषेधार्थ महा विकास आघाडी हिंगणघाटच्या वतीने निषेध व्यक्त करून दोषीवर कारवाई करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करून मास्टर माईंड वर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथे ‘ सिल्वर ओक ‘ निवास स्थानी बंगल्यावर एस.टी कर्मचाऱ्यांच्या जत्थ्याने भ्याड हल्ला केला, त्याचा आम्ही सर्व पक्षांच्या वतीने निषेध करण्यात आला आणि संबंधीत दोषीवर कारवाई करण्यात यावी असे आव्हान करण्यात आले.
उच्च न्यायालयानी दिनांक ०७ एप्रिल २०२२ रोजी गुरूवार ला संपकरी एस.टी . कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल पर्यत हजर होण्याचे आदेश दिले होते .शुक्रवारी दिनांक ०८ एप्रिल २०२२ ला एस.टी कर्मचाऱ्यांना एका जत्थ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार साहेब यांच्या मुंबई स्थित ‘ सिल्वर ओक ‘ बंगल्यावर निदर्शन करून दगडफेक आणि चप्पलेफेक केली ही बाब निंदनीय आहे.
हा कट पूर्वनियोजित होता.राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत.मात्र तो यशस्वी झाला नाही.या देशात असा प्रकार याआधी कधीच घडलेला नाही,आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि त्यादिवशी पासून अनेक प्रकारे हे सरकार पाडण्याचे काहींचे मनसुबे आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे.काल जो भ्याड हल्ला केला गेला त्याच्या मागे कोण आहे? याच्या त्या मागचा बोलविता धनी कोण आहे? याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही.एकदा छडा लागल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट महा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली.
तरी झालेल्या प्रकरणाची संपुर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी. तसेच झालेल्या भ्याड हल्याच्या मागे जो कोणी कटकारस्थान करत आहे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष शहर काँग्रेस पंढरीनाथ कापसे,सरचिटणीस वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी शालीकराव देहने, माजी पंचायत समिती सदस्य धम्मपाल भगत, माजी सरपंच महादेवराव ठक, मोतीबाबा झाडे, नाझिर अली, संतोष तिमांडे, शयाम इडपवार,संजय रहाटे ,मकसूद बावा, राकेश भोयर, पद्माकर गोवारकर,विठ्ठल लेंडे, गजानन राऊत, वसंत मानकर,शकील अहमद, किशोर धोबे, दिवाकर डफ इनायत खान, अजय , गणेश काटवले, संजय भाऊ ,अशोक पेटेकर,भीमराव नगराळे, दशरथ नागरे,अशोक पितेकर, सचिन ताखसांडे, प्रवीण थुल, सचिन उर्कुडकर, रामचंद्र थूल,हर्षल तपासे, युवराज माउस्कर,रोशन मोघे, निखिल वदणलवार,रितू मोघे, संगेश ससाणे,शंकर उडकुडकर, प्रवीण थुल,राजू परचिक,नयान निखाडे, हर्शल बुरीले,जय भोपळे,सचिन उदकुडकर,दिलीप कोडपे,प्रवीण झाडे,गजानन राऊत,सुनील वानखेडे,सुनील हरबुडे,प्रशांत भोयर,गुणवंत कामडी, ज्वलंत मून, मेराज सय्यद,दिलीप कोडपे,निर्मला कांबळे,बेबीताई मोहिजे,अर्चना पाटील,शामरावजी मोहिजे,मनीषा बावणे,मंदा डायगव्हाणे,यमुनाबाई सोनटक्के,मुक्ताबाई भट,अनिल सोनी,गणेशजी भट,प्रवीण महाजन इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.