रोखपाल कपीलची आत्महत्या नसुन घातपात … कुठुंबीयांचा पत्रपरिषदेत आरोप सखोल चौकशी करण्याची मागणी

रोखपाल कपीलची आत्महत्या नसुन घातपात …

कुठुंबीयांचा पत्रपरिषदेत आरोप सखोल चौकशी करण्याची मागणी

रोखपाल कपीलची आत्महत्या नसुन घातपात ... कुठुंबीयांचा पत्रपरिषदेत आरोप सखोल चौकशी करण्याची मागणी

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपिपरीतील महेंद्रा होम फायनान्स मध्ये रोखपाल या पदावर कार्यरत कपील वराते या तरुणाचा कार्यालयातच गळफास लावलेल्या स्थीतीत म्रुतदेह आढळून आला होता या प्रकरणी कपीलने आत्महत्या केली नसून त्याचा खुन करण्यात आला असा आरोप कुठूंबीयानी पत्रपरीषदातून केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी त्यानी केली 3 एप्रिल रोजी गोंडपिपरीतील महेंद्रा होम फायनान्स च्या कार्यालयात कपील वराते या 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थीतीत आढळून आला होता दरम्यान कपिलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले मात्र या घटनेबाबत कुठुंबीयानी विविध शंका उपस्थित केल्या आहेत कपीलचे पुढच्या महिन्यात लग्न होते तो कुठल्याही आर्थिक विवंचनेत नव्हता आपल्या मुलाने मूलाने आत्महत्या केल्या नंतर पोलिस व महेन्द्रा होम फायनान्स च्या कार्यालयातून आम्हाला कूठलीच माहीती देण्यात आली नाही घटनेनंतर खुप उशीराने कपिल चा अपघात झाला ही माहिती गावातुन मिळाल्याने आम्ही गोंडपिपरीला पोहोचलो मात्र तीथे गेल्यानंतर कार्यालयातच कपीलचा गळफास लावलेल्या स्थीतीत म्रुतदेह असल्याचे समजले घटनास्थळी कार्यालयाचे शेटर बंद करून पोलिस चौकाशी करीत होते आणि आम्हाला बाहेरच थांबवण्यात आले चौकशी अंती कार्यालयाचे शेटर उघडण्यात आले तेव्हा मूतदेह बघण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा कपील ज्या अवस्थेत होता ती अवस्था बघून त्यानी आत्महत्या केली असे वाटत नसल्याचे कुठुंबीयाचे म्हणने आहे कपील हा चेकदरुर येथील रहीवासी होता ज्या दिवशी त्याचा मूतदेह कार्यालयात आढळून आला होता त्यावेळी ही माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती त्याच वेळेस चेकदरुर येथील एका तरुणीने वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलिस स्टेशन मध्ये पोहचली व घटनेनंतर ती प्रत्येक सोप्सकारात ती पूढाकार घेत होती या मूळे तीच्यावर वराते कुठूंबीयानी तीच्यावर संशय व्यक्त केला आहे घटनेला आठ दिवस लोटले मात्र पोलिसांनी अद्यापही कुठूंबीयाचे बयान नोंदवीले नाही व याप्रकरणी कुठलीच चौकशी केली नाही दरम्यान ती तरुणी गावात नसल्याने कूठूंबीयांचा संशय अधीक बळावला आहे कपीलने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून सत्य समोर येईल अशी मागणी कपीलची आई कुसूम वराते व भाऊ देवीदास वराते यांनी पत्रपरीषदेतून केली आहे याप्रकरणी पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली