घुग्घुस येथे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ
🖋️साहिल सैय्यद…
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस : बुधवार १० एप्रिल रोजी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा घरोघरी प्रचाराला इंदिरानगर येथून सुरुवात करण्यात आली.
वेकोलि वसाहतीच्या गांधीनगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर येथे घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला तसेच मतदारांची भेट घेण्यात आली.
प्रचाराला भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू गोसकूला, चिन्नाजी नलभोगा, पुनम शंकर, सिनु रामटेके, शंकर सिद्दम, राजू रामटेके, श्रीनिवास आरेल्ली, मंगेश पचारे, रोहित जैस्वाल, बंटी बघेल, कुमार कुम्मरवार, गोपाल तोटा व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.