जामा मस्जिद येथे ईद उल फितर ची नमाज शांततेत अदा
शांतता व सुखशांतीसाठी दुआ च्या नंतर एकमेकाना शुभेच्छा दिल्या
अमान क़ुरैशी
तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही:- बुधवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर आज 11 एप्रिल रोजी देशभरात रमजान ईद ईद उल फित्र ईद साजरी करण्यात आली. वास्तविक, ईद-उल-फित्र हा सण जगभरात वेगवेगळ्या दिवशी चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असतो.
आज ईदच्या दिवशी सकाळच्या नमाज पठणाने सुरुवात झाली. लोकांनी पहाटे नवीन कपडे परिधान केले आणि नमाज अदा केली शांतता व सुखशांतीसाठी दुआ केली. यासोबतच सर्वानि एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या शुभ मुहूर्तावर प्रथम नमाज अदा केली जाते. यानंतर, जगभरात शांतता आणि सद्भावना राखण्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. त्याच क्रमाने सिंदेवाहीच्या सुन्नी जामा मस्जिदीत सर्वाणि सकाळची नमाज अदा केली आणि त्यानंतर एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या दिवशी नमाज अदा केल्यानंतर गोड खाण्याची प्रथा आहे, त्यामुळे या विशेष सणाला प्रत्येक घरात सिरखुरमा आणि शेवया तयार केल्या जातात. लोक एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांना मिठी मारतात, ईदच्या शुभेच्छा देतात.
जामा मस्जिद कमिटी,व जमातच्या सर्व सदस्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी
मस्जिद चे इमाम शाहनवाज़ आलम,मोअज्जन रहमान पठान,अद्यक्ष चाँद शेख सदस्य कदीर पठान,फजल शेख,रहीम पठान ,ठानेदार तुषार चव्हाण,रणधीर मदारे व पोलिस होमगार्ड उपस्थित होते. मस्जिद कमेटी व सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.