भरधाव चारचाकी वाहणाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

भरधाव चारचाकी वाहणाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

✍️ लुकेश कुकडकर ✍️ गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ भरधाव वेगाने अहेरी येथून आरमोरी कडे जाणाऱ्या कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अहेरी वरून आरमोरी येथे CET च्या पेपर करिता मुलांना घेऊन जात असलेल्या मारुती कंपनीच्या वॅगनार (क्रमांक सीजी 08, एयू 8932) कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या वाकडी येथील विनायक भोयर वय 55 वर्ष यांच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. यात भोयर यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.