गोरेगावमध्ये कुणबी एकता मंचच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीर

गोरेगावमध्ये कुणबी एकता मंचच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीर

कुणबी एकता मंच माणगाव यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न…

✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-कुणबी एकता मंच माणगाव यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कुणबी एकता आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने एक मोठे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर विनेश डवले यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव येथील संबोधित बौद्ध विहार येथे पार पडले. लोणेरे गोरेगाव विभागातील तरुणांनी मोठ्या संख्येने भाग घेत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले आणि या रक्तदान शिबीरला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

यावेळी कार्यक्रमाला विकास गायकवाड व जनकल्याण रक्त पेढी चे सहकारी उपस्थित होते.तसेच कुणबी एकता मंचाचे शिलेदार चंद्रकांत चेरफळे,प्रदीप शिंदे, सुधाकर करकरे, परेश अंधेरे,चंद्रकांत भोजने, सुजित भोजने,निलेश केसरकर, मुकेश भोस्तेकर,राम भोस्तेकर, निलेश टेंबे, प्रविण म्हसकर, प्रविण टेंबे,रमेश मोरे,महेश तळवलकर, सचिन खिडबिडे , मनिष खाडे ,अविनाश उतेकर, अमित दांडेकर, राजेश अंधेरे यांचा सक्रिय सहभाग होता. या शिबीरामुळे समाजात सामाजिक भावनेची जाणीव करून देण्यात आली आणि रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात यश आले.

या शिबीरातील रक्त संग्रहणा व्यतिरिक्त, रक्तदानाच्या महत्त्वावर वर एक सुंदर संपोलला मांडण्यात आली. हे रक्तदान शिबीर लोणेरे गोरेगाव विभागातील तरुणांमध्ये सार्वजनिक बांधिलकीची भावना जागृत करण्यात महत्त्वपूर्ण ठरले.या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक व आभार सुजित भोजने यांनी केले.