एम एम पी कंपनीला लागली आग.
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर मो 9096817953
उमरेड .उमरेड तेथील एमआयडीसी परिसरातील एमएमपी कंपनीमध्ये मिक्सर मशीन जळल्यामुळे खुप मोठा ब्लास्ट झाल्याने कंपनीने क्षणातच जोरदार पेट घेतल्याची घटना आज ११ एप्रिल शुक्रवारला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली या ब्लास्टमध्ये कंपनीत काम करणाऱ्या कामगारही जखमी झाले असून त्यांना आर्चएंजल हास्पीटल, ग्रामीण रुग्णालय तसेच काहींना नागपूर मेडीकलमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती आहे यामध्ये किती कामगार जखमी झाले ही माहिती बातमी लिहिस्तोवर मिळालेली नव्हती ही घटना घडताच अग्निशामक दलाला
पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे .