बामणी ग्रामपंचायत विकास निधी घोटाळ्यात १४ जणावर गुन्हा दाखल.
बामणी ग्रामपंचायत विकास निधी घोटाळ्यात १४ जणावर गुन्हा दाखल.

बामणी ग्रामपंचायत विकास निधी घोटाळ्यात १४ जणावर गुन्हा दाखल.

गटविकास अधिकारी  विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचासह अन्य सहा जणावर गुन्हा दाखल. बामणी येथील २८ लाखाचा विकास निधीचा घोटाळा करणाऱ्या १४ जणावर गुन्हा दाखल.

बामणी ग्रामपंचायत विकास निधी घोटाळ्यात १४ जणावर गुन्हा दाखल.
बामणी ग्रामपंचायत विकास निधी घोटाळ्यात १४ जणावर गुन्हा दाखल.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मुखेड :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की, मुखेड तालुक्यातील मौजे बामणी येथे ग्राम विकासासाठी शासणाच्या वतीने २०१५ ते २०२० या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेल्या २८ लाख ४१ हजार ७१९ रूपयाचे अपहार येथील ग्रामपंचायतीचे तात्कालीन कारभारी गटविकास अधिकारी २, विस्तार अधिकारी ३, इंजिनियर १, ग्रामसेवक ३, माजीसरपंच१, सरपंच पती १, माजी सरपंचाचे वडील १ असे एकून १४ जणांनी संगनमत करून अपहार केला असल्यांचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे संबंधित चौदा जणांविरुद्ध मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बामणी येथील ग्रामपंचायत विकास निधीत घोटाळा झाला असल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शनास आणण्याचे शेख नबीसाब महेताबसाब यांनी प्रयत्न करून ही या निवेदनाची दखल न घेता अपहार करणाऱ्यांची पाठ राखण करण्याचे काम येथील अधिकारी केले असल्याने तक्रारदर शेख नबीसाब यांनी न्यायायाचा दरवाजा खटखटवा लागला तेव्हा न्यायालयाने भ्रष्टाचार करणाऱ्या चौदाजणावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने मुक्रामाबाद पोलीस स्टेशन मध्ये १४ जणावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये  सरपंच सौ. वर्षा मुंगनाळे, ग्रामसेवक बी. टी. बिरादार, ग्रामसेवक शेख जाकीर हुसेन, एस. डी. गवई , पांडव मुंगनाळे, अंगणवाडी कार्यकर्ता आरती जाधव, ग्रा. पं. सदस्य व्यंकट बिरादार, वामनराव जाधव, गटविकास अधिकारी व्ही. एन. घोडके, व  सी. एल. रामोड, प्रभारी विस्तार अधिकारी एस. आर. तांबोळी, विस्तार अधिकारी डी. एन. चेनपुरे, विस्तार अधिकारी एस. जी. चिंतावार  यांच्यावर गुरनं ७५/२०२१ कलम ४२०, ४०९, ४१७, ४१९, ४६३, ४७८, ४७१, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here