जिल्हाधिकारी देशभ्रतार घेतली कोरोना प्रतिबंधक मोहिमेची माहिती

वर्धा जिल्हा प्रतिनिधी आशीष अंबादे 

हिंगणघाट  11/05/2021
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभरतार यांनी आज शहरास भेट देऊन कोरोना प्रतिबंधक मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोरोना चाचण्या व लसिकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सायंकाळी 4.20 चे दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधक लसिकरण,कोविड रुग्णव्यवस्था,विलगिकरण केंद्रातील स्थितीचा आढावा घेतला.संचारबन्दीच्या संबंधात त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर चाचरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार, ठाणेदार संपत चौव्हाण इत्यादि अधिकारी उपस्थित होते. भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक मातामंदिर वार्ड येथील शासकीय वस्तीगृहात असलेल्या विलगिकरण केंद्रास तसेच संत तुकडोजी वार्ड येथील म्हाडावसाहतीतील पोलिस तसेच कुटुंबियांसाठी असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देत उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here