धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाला, कोरोना नियम आणि सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.11मे:- बीड जिल्ह्यात कोरोना वायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर येत आहे. कोरोना वायरस बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. कोरोना वायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन वारंवार खबरदारी घेण्याची सूचना करत आहे. पण, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीच सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडवल्याचे समोर येत आहे.
बीड जिल्हात कोरोना वायरसचा संसर्ग बघता बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते महिलांसाठी कोविड सेंटरचे उद्घाटन पार पडले. पण, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. सार्वजिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार केली जात असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळे नियम आणि मंत्र्यांना वेगळे नियम असता का, असा सवाल या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे.