सांगलीत ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिम्मित धम्मदान.

56

सांगलीत ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिम्मित धम्मदान.

सांगलीत ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिम्मित धम्मदान.

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली,दि.10 मे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भ्रष्टाचार विरोधी संघटनेमार्फत कोरोना वायरस बाधित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात येते त्या उपक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ता उषाताई कांबळे यांच्याकडून 3500 रुपयांचे धम्मदान देण्यात आले.

आज राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सामाजिक भावनेने सर्वांनी समोर येऊन आपले योगदान देऊन गरीब जनतेला मायेची उब देन अगत्याचे आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता उषाताई कांबळे यांनी आपली समाजाप्रती असलेली तळमळ म्हणून अशा गरजू लोकांना धम्मदान दिले. अशा दानदात्या सामाजिक कार्यकर्ता उषाताई कांबळे यांच सर्वीकडुन कौतुक होत आहे.