पाणी टंचाई हिंगणघाट नगर परिषद कोमात, डाॅ. उमेश वावरे यांनी केले पाण्याचे वाटप.

67

✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒️
हिंगणघाट,दि.11मे:- जिल्हात कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनाने संपूर्ण वर्धा जिल्हात कडक लाॅकडाॅऊन आणि संचारबंदी लावण्यात आली. शासनाने नियम पाळून लोक आपला घरी राहून शासनाला सहकार्य करत आहे. हिंगणघाट शहरा अमृत योजना स्वरूपात शहरात खुप मोठं मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आला. हे सर्व असताना सुद्धा दर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना हिंगणघाट येथील जनतेला करावा लागतो नगर परिषदला ही बाब माहीत असून सुद्धा यावर काही उपाय योजना नगर पालिका प्रशासन करत नाही हि बाब गंभीर असून, यांच्या त्रास फक्त जनतेला होत असल्याने. हि बाब लक्षात घेता आज वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांनी संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखान्याच्या मागे पाण्याचे वाटप केले.

शासनाने नगर पलिकेची स्थापना या साठी केली की, स्थानिक जनतेचे प्रश्न हे नगर पलिकेच्या माध्यमातुन सोडवीण्यात येणार पण आज हिंगणघात नगर पालिका कुंभकर्णाची भुमीका वाटवत आहे. आणि हिंगणघाटकर पाण्यावाचुन तळमळत आहे. पाणी देण्याचे काम हे नगर पालिकेचे असून लवकरात लवकर पाण्याचे टाॅकर चालू करावे अन्यथा सर्व लोकांना घेवून नगर पालिका वर मडके फोड आदोलन करण्यात येईल अशी माहिती वंचीत बहुजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी दिली. यावेळी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, बन्सोड सर, देवेंद्र भालशंकर, व वार्डतील नागरीक उपस्थित होते.