समता सैनिक दलाचा खरा पँथर रुपेश मेंढे यांच कोरोनाने निधन.

प्रशांत जगताप, प्रतिनिधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथील विर भगतसिंग वार्ड मधील राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत आणि समता सैनिक दलातील खरा आंबेडकर पँथर रुपेश ज्ञानेश्वर मेंढे यांच आज कोरोना वायरसमुळे निधन झाल.
रुपेश ज्ञानेश्वर मेंढे हे भद्रावती येथील डिफेन्स येथे कार्यरत होते. ते मनमिळाऊ, दानशुर, प्रेमळ स्वभावामुळे ते नेहमी सामाजिक कार्यात, धार्मिक कार्यात समोर असायचे. त्यांचा निधनाने आंबेडकरी चळवळ आणि समता सैनिक दल आपल्या एका कर्तुत्ववान कार्यकर्ताला मुखला आहे. त्याचा अस अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांचा मागे त्याचा परीवार आहे.