चामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
दहा हजार रूपयांची लाच घेताना केली रंगेहाथ अटक.
✒धनराज आर वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी : चामोर्शी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० मे रोजी दुपारच्या सुमारास रंगेहाथ अटक केली.
सागर पोपट डुकरे (३२) असे लाचखोर पशुधन विकास अधिकारी वर्ग 9 अधिकाऱ्याचे नांव असुन ते चामोर्शी येथील पशुधन विकास कार्यालयात कार्यरत आहेत. यांच्याकडेच पूर्वी चामोर्शी पंचायत समितीच्या बीडीओ पदाचा प्रभार होता हे विशेष. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराला एक हजार मांसल पक्षी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत २ लाख २५ हजार रूपये मंजूर करून लाभ देण्याच्या कामासाठी ९ मे रोजी पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी प्रतिबंधक
लाचलुचपत विभागाच्या तपासी पथकाने ि केली. पडताळणी अंती १० मे रोजी दहा हजार रुपयांची लाच घेताना आरोपी सागर डुकरे यास रंगेहाथ अटक केली व गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या निरीक्षणात पोलिस निरीक्षक सापळा व तपासी अधिकारी शिवाजी राठोड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, पोलिस हवालदार नत्थु धोटे, पोलिस नाईक राजेश पडमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोलिस शिपाई घोरमोडे , चालक वडेट्टीवार, महिला पोलिस शिपाई ज्योत्स्ना वसाके यांच्या पथकाने केली.