शांतिगिरी महाराजांचा सर्वसामान्य जनतेसाठी वचननामा प्रसिद्ध जे करणार तेच बोलणार आणि जे बोलणार तेच करून दाखवणार: शांतिगिरी महाराज

शांतिगिरी महाराजांचा सर्वसामान्य जनतेसाठी वचननामा प्रसिद्ध

जे करणार तेच बोलणार आणि जे बोलणार तेच करून दाखवणार: शांतिगिरी महाराज

शांतिगिरी महाराजांचा सर्वसामान्य जनतेसाठी वचननामा प्रसिद्ध जे करणार तेच बोलणार आणि जे बोलणार तेच करून दाखवणार: शांतिगिरी महाराज

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. ८६६८४१३९४६

नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांमध्ये चांगलीच लढत पाहायला दिसून येत आहे महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर अशी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार बेरजेचे गणित करत मग्न आहे. ह्या निवडणुकीत जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत शांतिगिरी महाराज व राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

त्यातच आज दिनांक 11 मे रोजी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी नाशिकच्या विकासाचा वचननामा जाहीर केला. वचन नामा नाशिकच्या विकासात भर घालणारा आहे. ह्या वचननाम्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, नागरी सुविधा, उद्योग, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास, महिला व युवती सक्षमीकरण, युवा सक्षमीकरण, जलसंधारण ग्रामीण विभाग, आरोग्य सेवा, कामगार कल्याण, साहित्य कला व संस्कृती, पर्यावरण संवर्धन अशा प्रमुख विषयावर भर दिला आहे.

आजवर विविध पक्षांचे अनेक जाहीरनामे नाशिकच्या जनतेने पाहिले असतील परंतु नाशिककरांसाठी बाबाजींचा हा वचननामा आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासन आम्ही नाशिकच्या जनतेला देणार नाही. कारण ह्या जाहीरनाम्यात आम्ही जे करणार तेच बोलणार आहोत आणि जे बोलणार ते नाशिककरांना करून दाखवणार आहोत असे आश्वासन वचन नामा जाहीर करताना शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.

शेतकऱ्यांवर बोलताना शांतीगिरी महाराज म्हणाले की शेतकरी हा आमच्यासाठी प्रथम प्राधान्यांचा विषय आहे. शेतकरी टिकला तर देश टिकेल असा आमचा विचार आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून कुठल्याही राजकारणाला बळी न पडता शेतकऱ्याचा आवाज प्रामाणिकपणे संसदेत पोहोचवणार, शेतकरी प्रश्नावर वेळप्रसंगी सरकार विरोधात भूमिका घेण्याची देखील आमची तयारी असेल, शेतकऱ्यांना 24 तास वीज बिल व मुबलक पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार. नाशिकच्या खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर नाशिकला मुंबई आणि पुण्याशी जोडण्याची गरज आहे त्यासाठी नाशिक मुंबई लोकल सुरू करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणार. लोकांचा विकास करायचा असेल तर शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे बाबाजी म्हणाले. शासकीय शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, नाशिकमध्ये योग विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठ उभारणार असे बाबाजींनी सांगितले.

आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकला फार मोठा पौराणिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांचा विकास करून गोदा घाटाचे रूप पालटून, अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी कृती आराखडा तयार करणार असल्याचं बाबाजींनी सांगितले. महिलांच्या विषयी बाबाजींनी सांगितले की, महिला सक्षम तर समाज सक्षम ह्या विचाराने महिला वर्गासाठी भरघोस काम करणार. महिलांच्या उद्योजकतेला प्राधान्य देण्यासाठी बचत गट चळवळीला प्राधान्य देऊन, औद्योगिक वसाहतीमध्ये जमीन उपलब्ध करून देणार. विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची उभारणी करणार. आरोग्य सेवा हीच धनसंपदा आरोग्य चांगले असेल तर विचार व मनही चांगले असते. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक च्या धरतीवर नाशिक मध्ये ठीक ठिकाणी सेवा क्लिनिक उभारणार. आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी अर्थसंकल्पातील तरतूद वाढवण्यासाठी आवाज उठवणार. ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांसाठी रिक्त जागांची भरती करणार.
कामगारांना वेतनाच्या माध्यमातून योग्य मोबदला सोबतच सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी धोरण आखणार असल्याचे सांगितले. मनरेगा अंतर्गत कामांसाठी वेतन वाढ त्रुटी कमी करण्यासह सार्वजनिक कामांची व्याप्ती वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामान्य जनतेला लाभ होईल असा वचननामा शांतिगिरी महाराजांच्या वतीने जाहीर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here